पुणे : जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात हे मी महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिले. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आत्तापर्यंत सर्व मुख्यमंत्री मी पाहिले आहेत पण जबाबदार लोक इतका प्रकट बोलतात हे पहिल्यांदा पाहिले असे प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली मनोज जरंगे पाटील यांना शरद पवार स्क्रिप्ट घेऊन देत असल्याचा आरोप भाजपाकडून केला जात आहे या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांना शरद पवारांनी उत्तर दिले.
जरांगेंच्या उपोषणाच्या वेळी मी पहिल्यांदा भेटायला गेलो होतो आणि त्यांना भेटून मी एवढंच सांगितलं तुमच्या मागण्या मी समजू शकतो पण दोन समाजात अंतर वाढेल असं काही करू नका. एवढाच माझा त्यांच्याशी भेटीदरम्यान संवाद झाला होता त्यानंतर आज अखेर पर्यंत त्यांच्याशी माझे एका शब्दाने बोलणे झाले नाही असा खुलासा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
राजेश टोपे यांच्या माध्यमातून सरकार संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते याची माहिती मला आहे. परंतु एका बाजूने मदत घ्यायची व दुसऱ्या बाजूने आरोप करायचे असं झालं तर राज्य सरकारची अडचणीच्या प्रसंगी सुसंवाद कोण ठेवेल.
एस आय टी ची चौकशी करा न्यायालयाच्या जजमार्फत चौकशी करा आमची कोणतीही हरकत नाही. कर नाही त्याला डर कशाला आमचा कोणताही संबंधच नाही. शरद पवार यांनी जरंगे पाटील यांच्यावर एस आय टी ची चौकशी नेमली असल्याच्या प्रश्नावर मत मांडताना सांगितले.