शेतकरी व शेतकऱ्यांचे पोरं हीच माझे इलेक्ट्रॉल बॉंड आहे सुसगाव येथील प्रचारात राजू शेट्टी यांचे प्रतिपादन

पुणे : शेतकरी व शेतक-यांची पोर हीच माझे इलेक्ट्रॅाल बाँड आहेत .यामुळे मी आजही लोकवर्गणीतून लोकसभा निवडणूक लढवतोय असे हातकंगले मतदार संघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.

सुसगाव येथे माजी खासदार राजू शेट्टी  यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकंगले मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींचां संवाद साधला. यावेळी पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरातील अनेक मतदार या भागात येतात ,त्यांच्याशी  संवाद साधून अनेक विषया वरती साधक बाधक चर्चा केली व सर्व मतदारांचे समस्या अडचणी समजून घेतल्या.

राजू शेट्टी म्हणाले,  मोदी सरकारने घेतलेले अनेक चुकीचे निर्णय हे लोकशाहीला घातक व देशाच्या हिताचे नसून कशा पद्धतीने शेतकरी गोरगरीब कामगार हा पिळवटलेला आहे, व हे सरकार उद्योगपती धारजन्या पद्धतीने काम करत आहे. याबाबतीत अत्यंत खुले मनाने चर्चा करून आपले मत व्यक्त करण्यात आले. माननीय साहेबांनी यावेळी मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या विरोधातील सरकार असून उद्योगपतींची हजार कोटीचे कर्ज माफ केले परंतु शेतकऱ्यांचे छोटीशी कर्ज माफ करण्यासाठी ,नवीन योजना आणून देण्यासाठी, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कुचकामी ठरलेले आहेत. सर्व सरकारी क्षेत्रामध्ये खाजगीकरण ,वाढती महागाई, लक्ष वेधले.

लोकांना मतदान करण्यासाठी येण्याचे विनंती केली. सदरील कार्यक्रमाची प्रस्ताविक हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश तात्या बालवडकर यांनी केले.
याप्रसंगी राजू शेट्टी साहेब  व अध्यक्ष अमरसिंह कदम, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर बांगर,बाप्पू कारंडे ,एडवोकेट योगेश पांडे, सुदिन खोत, स्वाभिमानी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष दिलीप बालवडकर , नारायण चांदेरे, उपसरपंच भोते, चंद्रकांत पाटील ,सा,कार्यकर्ते अशोक गु बालवडकर, संदीप बालवडकर, हनुमंत बालवडकर, उमेश सत्रे, अमित कुडले, मारुती गोरडे, खेड तालुका अध्यक्ष, काशिनाथ दौंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना संगणक कौशल्य विकासाचे प्रशिक्षण