म्हाळुंगे येथील कुल इकोलोच, अल्पाईन, लिओनारा, बेलिअर, गोदरेज हिल साईड १ व २ या सोसायटीतील नागरीकांशी अमोल बालवडकर यांचा संवाद

म्हाळुंगे : म्हाळुंगे येथील कुल इकोलोच, अल्पाईन, लिओनारा, बेलिअर, गोदरेज हिल साईड १ व २ या सोसायटीतील नागरीकांशी प्रत्यक्ष भेटुन विविध विषयांवर माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चर्चा केली.


प्रामुख्याने सुस-म्हाळुंगे येथील पाणी प्रश्न, रस्ते, कचरा, पथदिवे, पी.एम.पी.एम.एल.बस सेवा अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी नगरसेवक काळामध्ये बाणेर-बालेवाडी-पाषाण -सुतारवाडी-प्रभागात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातुन केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली व आगामी काळात सुस व म्हाळुंगे या नव्याने समाविष्ठ गावांसाठी मंजुर करण्यात आलेल्या २४x७ सारख्या महत्वकांक्षी प्रकल्पाची देखिल सविस्तर चर्चा करुन माहिती दिली.


यावेळी अंकुश पाडाळे, आशिष खैरे, ज्ञानेश्वर भटाने, हनी आत्मापुरकर, समिर पटेल, निलेश गोडसे, रविंद्र पाटील, जाग्रुती विचारे, बी.डी.पाटील काका, राजीव रंजन, सुरभी जोशी, चैतन्य कोरे, संदिप इंगळे, संदिप वानखेडे, राहुल कदम, शिवा फत्तेपुरे व इतर सोसायटीतील सभासद उपस्थित होते.

See also  शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ मुंबई