बाणेर-बालेवाडी-सुस-महाळूंगे परिसरात वामा वुमेन्स क्लब तर्फे महिलांसाठी रंगपंचमीच्या कार्यक्रमाचे आयोजन

बाणेर : रंगपंचमी सणाच्या निमित्ताने पहिल्यांदाच बाणेर-बालेवाडी- सुस-महाळूंगे परिसरात वामा वुमेन्स क्लब तर्फे खास बचत गटातील महिलांसाठी रंगपंचमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

एरवी विविध कामामध्ये, व्यवसायामध्ये मग्न असलेल्या महिलांनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून सहभाग नोंदवत अनोख्या अशा संस्कृतीचे दर्शन घडवले. सर्वांनी एकमेकांना रंग लावत ह्या खेळाचा आनंद लुटला.ह्या कार्यक्रमाबरोबरच महिलांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध छटा अनुभवास मिळाल्या जेणे करून एकमेकांना ह्याचा फायदा होऊन आपापसातील ऋणानुबंध आणखी घट्ट होण्यास मदत होणार आहे.

अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने सर्वांनी व्यक्त केले समाधान आणि कौतुक निश्चितच संस्थेच्या  पुढील वाटचालीसाठी प्रेरणा आणि उभारी देणारे ठरणार आहे.सौ पूनम विशाल विधाते
अध्यक्षा वाम वूमेन्स क्लब यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बाणेर बालेवाडी सुस महाळूंगे मधील महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या.

See also  पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने विजय संकल्प मेळाव्यात भाजपावर जोरदार टीका