मोदी सरकार च्या विरोधात पुणे शहर काँग्रेस कमिटी तर्फे एम.जी. रोड येथे आक्रोश रैली व कँडेल मार्च द्वारे निषे:ध

पुणे : मोदी सरकार च्या विरोधात पुणे शहर काँग्रेस कमिटी तर्फे एम.जी. रोड येथे आक्रोश रैली व कँडेल मार्च काढण्यात आली.

भारतीय नवीन संसद भवन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले.

देशाला गोल्ड मेडल मिळवून देणाऱ्या ह्या मुली ,खेळाडू ,यांना लाथा काठयाने मारणे, अटक कारणे , फरफटत नेणे म्हणजे संविधाना ची क्रूर हत्याच आहे जे मोदी सरकार करत आहे.
ह्या महिला खेळाडूंना न्याय मिळालाच पाहिजे आणि बलात्कारी ब्रुजभुषण ह्याला अटक व कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे,
त्यासाठी पुणे शहर काँग्रेस तर्फे ” आक्रोश रॅली ” कँडेल मार्च चे आयोजन करण्यात आले.
एम. जी. रोड चे बाटा च्या दुकाना पासून ते भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जी यांच्या पुतळ्या पर्यंत पुणे कॅम्प पर्यंत ही आक्रोश रॅली काढण्यात आली.
ह्या आंदोलनात खेळाडू मुली, ॲथलीट्स सहभागी झाले होते.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी, अरविंद शिंदे ( अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस ), अभय छाजेड, संगीता तिवारी, कमल व्यवहारे, लताताई राजगुरू, सुजाता शेट्टी, रफिक शेख, नीता राजपूत, वीरेंद्र किराड, रजनीताई त्रिभुवन सर्व ब्लॉक अध्यक्ष व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  १५० किलो बुंदीचलाडू चे छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त वाटप.