पुण्यात मनसेची मते कोणाला ?

राजेंद्र पंढरपूरे
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एकगठ्ठा मते भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना पडतील का ? हाच कळीचा प्रश्न आहे.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे दोघेही मनसेचे नेते होते. आणि दोघांचेही मनसे कार्यकर्त्यांशी अजूनही संबंध जिव्हाळ्याचे आहेत. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मनसेच्या मतदारांनी धंगेकर यांना मोठ्या प्रमाणात मते दिली. त्याची पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत होईल आणि धंगेकर आणि मोरे यांच्या पारड्यात मनसेची मते जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुण्यातील भाजपसाठी राज ठाकरे यांचा पाठिंबा कितपत मिळेलं याची जाणीव त्या पक्षाला झाली आहे.

लोकसभेच्या १९ सालच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हटाव अशी भूमिका घेतली. त्यासाठी राज्यभर सभा घेतल्या आणि पाच वर्षांनंतर मोदींना पाठिंबा जाहीर केला. अशा परस्परविरोधी भूमिकांमुळे मनसे कार्यकर्त्याची मात्र पंचाईत झाली आहे.पक्षाने लोकसभा निवडणूक लढविली असती तर ठिकठिकाणी विधानसभा निवडणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असते, अशाही मते मांडण्यात आली.

See also  कोथरूड मतदारसंघातील ३५ कोटीच्या कामांचे महिलांच्या हस्ते भूमिपूजन