सुस रस्त्यावरील भांडे चौकातील खड्डा बुजवण्यात यावा – मनसे

सुस :  सुस रस्त्यावरील सुस कडून पाषाणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भांडे चौक (सुस खिंड) जिथे मुंबई बेंगलोर हायवेला जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता चालू होतो तेथील रस्ता पालिकेच्या ठेकेदाराकडून किंवा तेथील बांधकाम व्यावसायिकाकडून गेले अनेक दिवसनपूर्वी काम करतेवेळी रस्ता पालिकेच्या ठेकेदाराकडून किंवा तेथील बांधकाम व्यावसायिकांकडून गेले अनेक दिवसापूर्वी काम करतेवेळी रस्ता खोदण्यात आला होता. परंतु अनेक दिवस होऊनही तो बुजविण्यातही आला नाही.

सुस रस्ता हा अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे आणि त्यात ह्या ठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहे. अनेक दुचाकी, चारचाकी चालकांना व स्थानिक रहिवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता पुढे मुंबई-बेंगलोर महामार्गाला मिळत असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. पादचाऱ्यास व वाहनचालकास अंधारामुळे खड्डा दिसत नसल्याने अफाट होण्याची दाट शक्यता आहे. रविवार दि १४ जुलै २०२४ रोजी चारचाकी गाडी या खड्ड्यात गेल्याने वाहनचालकाला मोठी दुखापत झाली व गाडीचेही मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच गेल्या ५ ते ६ दिवसात या ठिकाणी अनेक वेळा छोटे मोठे अपघात झाले आहेत. त्यामुळे या प्रकाराला कंटाळून स्थानिक रहिवासी व वाहनचालक आमच्या कार्यालयात येऊन तक्रारी करत आहेत.
महापालिका आपले नियम स्वतः पाळत नाही. खड्डा खोदणाऱ्या ठेकेदार अथवा बांधकाम व्यावसायिक व मनपा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.


जर संबंधित खड्डा खोदणाऱ्या ठेकेदार अथवा बांधकाम व्यावसायिक व मनपा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर नागरिकांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे  आंदोलन केले जाईल याची आपण नोंद घ्यावी अशाप्रकारचे निवेदन  महापालिका सहाय्यक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय, औंध, पुणे यांना देण्यात आले यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.  


                             

See also  मराठा समाजातील तरुणांनी न्यूनगंड सोडावा आणि प्रगती करावी - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ अरुण अडसूळ यांचे आवाहन