म्हणून पानसरे यांची हत्या झाली

पुणे : मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर याबाबतची माहिती नागरिकांना देण्यासाठी मी, एम. एन. मुश्रीफ आणि कॉ. गोविंद पानसरे आम्ही राज्यात “हु इज‌ करकरे” या आंतर्गत सभा घेणार होतो. दोन सभा झाल्यानंतर पानसरे यांची हत्या झाली. ही हत्या मुंबई हल्ल्यासंदर्भात खरी माहिती लोकांसमोर येऊ नये, म्हणून करण्यात आली.

त्यानंतर त्याला “शिवाजी कोण होता?” या पुस्तकामुळे झाल्याची चर्चा घडवण्यात आली.मुंबई हल्ल्यासंदर्भात आयबीने माहिती दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.  माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची विचारसरणी हिंदुत्ववादी होती, ते पूर्वीपासूनच आरएसएसशी निगडीत होते. त्यामुळे त्यांनी सरकारी वकील म्हणून योग्य प्रकारे काम केले नाही, असेही कोळसे पाटील म्हणाले.

पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील बोलत होते. यावेळी पुणे लोकसभा प्रचार प्रमुख माजी आमदार मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.

See also  केंद्रीय अर्थसंकल्पात पुणेकरांच्या हाती भोपळा मध्यमवर्गीय नोकरदारांचा भ्रमनिरास -माजी आमदार मोहन जोशी