बाणेर बालेवाडी स्मार्ट सिटी एरियामध्ये अवघे ४१ टक्के मतदान

पुणे : बाणेर बालेवाडी विधाते वस्ती स्मार्ट सिटी एरियामध्ये मतदानामध्ये निरुत्साह पाहिला मिळाला अवघड 41 टक्के मतदान या परिसरात झाले आहे.

बाणेर बालेवाडी विधाते वस्ती परिसरामध्ये ९१५७० एकूण मत संख्या होती यापैकी केवळ ३७७९० मतदान नागरिकांनी केली. सुमारे 41. 59% मतदान झाल्याने स्मार्ट सिटी एरिया असलेल्या बाणेर बालेवाडी मध्ये मतदान प्रक्रियेत निराशा पाहायला मिळाली.

मोठ्या प्रमाणात सुशिक्षित असलेला वर्ग तसेच सामाजिक दृष्ट्या पुढाकार घेणाऱ्या नागरिकांच्या संघटना, पालिकेचे दिग्गज समजले जाणारे राष्ट्रवादी व भाजपाचे दिग्गज चाराही प्रतिनिधी तसेच राजकीय पक्षांचे महत्त्वाचे प्रक्रिया परिसरात असताना देखील मतांची एक टक्केवारी फारशी प्रभावी ठरली नाही.

बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडी प्रभागामध्ये पाषाण सुतारवाडी सोमेश्वरवाडी, लमाण तांडा पंचवटी परिसरामध्ये 50% हून अधिक मतदान झाले. ५३५५३ एकूण मतांपैकी सुमारे २७००३ इतके मतदान या परिसरात झाले. ५०.४२ टक्के मतदान या परिसरात पहायला मिळाले.

आगामी वर्ष हे निवडणुकांचे वर्ष मानले जाते लोकशाहीचा स्तंभ मजबूत करण्यासाठी मतदान ही प्रक्रिया महत्त्वाची असताना स्मार्ट सिटी एरिया मध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाला अधिकचे प्रयत्न करावे लागतील. नागरिकांच्या मध्ये निर्माण झालेली निराशा दूर करण्यासाठी प्रभावी काम गरज आहे. तसेच या परिसरातील सामाजिक संघटनांनी देखील यात पुढाकार घेतला पाहिजे.

See also  पुणे महापालिकेच्या ९३ रजा मुदत शिक्षकांच्या वर्षाखेरचा आनंद द्विगुणित