बाणेर : बाणेर येथील यशवंत चौक विधाते वस्ती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर महिला कार्याध्यक्ष पूनम विशाल विधाते यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे “माझी लाडकी बहीण” योजनेच्या समर्थनार्थ हि योजना अविरत पणे सुरु राहावी म्हणून ‘स्वाक्षरी मोहिम’ या उपक्रमाचे उद्घाटन खासदार आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष व महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रास्ताविक करताना पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्याध्यक्ष सौ. पूनम विशाल विधाते म्हणाल्या की, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या प्रयत्नातून सुरू झालेल्या लाडक्या बहिणी योजनेमुळे महिलांना अधिक सक्षम बनविण्याचे काम झाले. म्हणून लाडकी बहीण या योजनेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिमेस महिलांनी उपस्थितीत राहून मला साथ दिली. येणाऱ्या पुढील काळात देखील विविध उपक्रमातून मी आपल्यासमोर अशीच येत राहील अशी ग्वाही या कार्यक्रमानिमित्त आपणास देते.
रूपालीताई चाकणकर (राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष व महिला आयोगाच्या अध्यक्ष) म्हणाल्या, पुनम विधाते यांनी पुणे शहर महिला कार्याध्यक्ष पद घेतल्यानंतर कामाचा धडाका सुरू केला आहे. शासनाच्या विविध योजना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम त्या करत आहेत शिवाय विविध वेगवेगळे उपक्रम राबवत महिलांना अधिक सक्षम करण्याचं काम हे त्या करतात ही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादांनी भाऊ म्हणून महिलांना अधिक सक्षम करण्याची कायम भूमिका घेतली म्हणूनच त्यांच्या पाठीशी उपस्थित सर्व बहिणींनी खंबीर पणे उभे राहायचे.
खासदार सुनील तटकरे (अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) म्हणाले,पूनम ताईंनी बाणेर येथे स्त्रियांच्या सन्मानार्थ उपमुख्यमंत्री अजित दादांनी अर्थसंकल्पात सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेच्या पुरस्कारार्थ आगळीवेगळी सह्यांची मोहीमे निमित्त अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणात मोठ्या संख्येने महिला भगिनी जमल्या त्यांचे स्वागत आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात बॅनरच्या प्रभागापासून मला करता आली त्याबद्दल मी पुनम ताईंचा मी आभारी आहे. दादांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कष्टकरी महिलांची आवश्यकता लक्षात घेत सरकारने ही योजना आणली. महिलांसाठी सुरू केलेल्या अशा विविध योजनांच्या माध्यमातून भविष्यात बाणेर येथील मोठी प्रशासकीय अधिकारी झालेल्या महिलेचा सन्मान आमच्या हस्ते घडो अशी गणरायाच्या चरणी सदिच्छा व्यक्त करतो, पुनम ताई आपण करत असलेल्या कार्य आम्ही पाहतोय त्याची दखल येणाऱ्या काळात आम्ही नक्की घेऊ असा विश्वास या कार्यक्रमानिमित्त देतो :