केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना तालमीतील मित्र त्यांच्याच बंदोबस्तासाठी भेटतो तेव्हा…

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ संघटनात्मक दौऱ्यानिमित्त आज कोल्हापूर जिल्ह्यात गेले असता त्यांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या पोलिसांच्या सुरक्षा बंदोबस्तात कोल्हापूर पोलीस दलात कर्तव्यास असणारे कोल्हापूरच्या तालमीतील मित्र श्री. शहाजी पाटील अचानक समोर आले. यावेळी मित्र शहाजी दिसताच मोहोळ यांनी ताफा थांबवत त्यांची भेट घेतली आणि संवाद साधला.

इतक्या वर्षांनी अचानकपणे झालेली ही भेट मोहोळ यांच्यासाठी सुखद धक्का देणारी ठरली. इतकंच नाही तर त्याला पाहाताक्षणी तालमीत असतानाच्या आठवणींचा पट मोहोळ यांच्या क्षणार्धात डोळ्यासमोर उभा राहीला.

See also  ग्रेट व्हिजन इंग्लिश स्कूल निगडी यांच्या वतीने शालेय ज्ञानारंभ् दिन वृक्षारोपण करून साजरा