हडपसर : केशवनगर, पवार वस्ती परिसरातील पाणी पुरवठा प्रश्ना संदर्भात वंचित बहूजन आघाडीच्या पुणे शहराध्यक्ष मुनावर कुरेशी यांच्या मार्गदर्शनाखाली लष्कर पाणी पाणीपुरवठा येथे आंदोलन घेण्यात आले.
त्यावेळी हडपसर विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक 22 मधून प्रभागाचे अध्यक्ष सचिन भडकवाड यांच्या नेतृत्वातून तसेच हडपसर विधानसभेतील अध्यक्ष विश्वास गदादे तसेच जीवन गाडे महासचिव हडपसर विधानसभा. मिलिंद सरोदे उपाध्यक्ष हडपसर विधानसभा. अमोल भडकवाड उपाध्यक्ष प्रभाग 22 तसेच अनेक पदाधिकारी आणि प्रभागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दोन दिवसांमध्ये केशवनगर पवार वस्ती मधील प्रभाग क्रमांक 22 मध्ये पाण्याची सोय करून द्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला