सहाय्यक आयुक्तांचे अधिकार वाढवले मुख्यखाते आणि क्षेत्रीय कार्यालयात समन्वय राखण्यासाठी महापालिका आयुक्तांचा निर्णय

पुणे : महानगरपालिकेची क्षेत्रिय कार्यालये तसेच मुख्य खाते याकडून राबविण्यात येणारी कामे, योजना यात समन्वय आणण्याकरिता खालीलप्रमाणे सूचना पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी निर्गमित केल्या आहेत.


१. महापालिका सहाय्यक आयुक्त यांना त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी नोडल अधिकारी” (समन्वय अधिकारी) म्हणून घोषित करण्यात येत आहे.
२. महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अंमलबजावणी होत असलेल्या सर्वच विभागांच्या कामांचे पर्यवेक्षण करावे.
३. महापालिका सहाय्यक आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात विविध विभागांकडून अंमलबजावणी करण्यात येत असलेली कामे, योजना इत्यादीच्या सनियंत्रणाची
जबाबदारी महापालिका सहाय्यक आयुक्त यांची राहील व या सर्व कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ते जबाबदार राहतील.
४. महानगरपालिकेच्या क्षेत्रिय स्तरावर कार्यरत असणाऱ्या सर्वच विभागांच्या सर्व संवर्गातील अधिकारी/ सेवक यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त यांचेशी समन्वयसाधणे व त्यांच्या निर्देशाचे पालन करणे बंधनकारक आहे. यासाठी महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी दर पंधरवड्याला सर्व संबंधितांची बैठक घेऊन समन्वयाच्या मुद्यांचा आढावा घ्यावा.
५. ज्या विभागांचे क्षेत्रिय स्तरावर अधिकारी कर्मचारी महापालिका सहाय्यक आयुक्तयांच्या सूचनांना प्रतिसाद देणार नाहीत अथवा त्यांचे पालन करण्यास कसूर करतील अशा सेवक / अधिकारी यांचा दरमहा अहवाल महापालिका सहाय्यक आयुक्त यांनी संबंधित अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचेमार्फत महापालिका आयुक्त यांच्या निदर्शनास आणावा.

See also  नमो चषक अंतर्गत शरीर सौष्ठव स्पर्धेत गणेश बनकर "कोथरूड श्री" विजेता