धनकवडी- सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३६,३७,३८ मधून ६४ जणांनी उमेदवारी मागे घेतली तर ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

सचिन कोळी – पुणे : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, २ जानेवारी २०२६ रोजी धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र. ३६, ३७ आणि ३८ मधील एकूण ६४ उमेदवारांनी दुपारी ३ वाजेपर्यंत आपले अर्ज मागे घेतले आहेत. ज्या चढाओढीने उमेदवारी दाखल केली गेली ज्यामुळे प्रभागांमध्ये प्रचंड संघर्षपुर्ण लढती होतील असा अंदाज होत असताना ६४ जणांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने प्रमुख राजकिय पक्षांसमोर बंडखोरांचे उभे ठाकलेलं आव्हान निष्प्रभ होवून थेट लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे.

प्रभाग निहाय अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची नावेः
प्रभाग क्रमांक ३६ (सहकारनगर – पद्मावती) – या प्रभागातून चारही जागांसाठी मिळून एकूण २६ उमेदवारांनी माघार घेतली आहे.

जागा ‘अ’: जगताप संजय सुखदेव, जयदेव अहीलू इसवे, कांबळे उद्धव लहू, कांबळे औदुंबर विठ्ठल, चौरे संगीता नंदकुमार, जाधव अनिल वसंत, डावरे धर्मेंद्र भिवाजी, पवार नामदेव निवृत्ती, अमोल मधुकर ननावरे, धडे सागर सुखदेव, खंडाळे सुरज युवराज आणि जगताप श्रीनिवास सुभाष.

जागा ‘ब’: पोतदार सुकन्या अमोल आणि मोरे मोनिका कैलास.

जागा ‘क’: नांदे लता केशव, बागुल जयश्री उल्हास आणि भुजबळ कार्तिकी ऋषिकेश.

जागा ‘ड’: कडू संजय बबन, नितीन शिवाजीराव पाटील, वाघमारे आनंद मिलिंद, खोपडे प्रतिक गजानन, कदम नितीन मधुकर, जाधव निलेश सुरेश, मरळ गोरख जगन्नाथ, मोरे शितल कैलास आणि व्यवहारे आशिष नरेंद्र.

प्रभाग क्रमांक ३७,
धनकवडी-कात्रज डेअरी
या प्रभागातून एकूण ९ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

जागा ‘अ’: बदक सचिन मधुकर, यादव संकेत संजय आणि माने दिपक नाथा.

जागा ‘ब’: रुपाली कैलास भोसले आणि भापकर स्वाती वसंत.

जागा ‘क’: भागवत अश्विनी सागर आणि माने सरला दिपक.

जागा ‘ड’: धनकवडे हनुमंत उत्तम आणि संतोष यशवंत फरांदे.

प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर- आंबेगाव- कात्रज  या प्रभागात एकूण २९ उमेदवारांनी माघार घेतली असून यात महिला व उमेदवारांनी संख्या जास्त आहे.

जागा ‘अ’: ज्योती महेश भोगावडे आणि रासकर प्रिया रितेश.

जागा ‘ब’: काशिद सुमित काशिनाथ, भोसले सचिन श्रीरंग आणि किवडे महेश गणपती.

जागा ‘क’: दांगट नीलिमा प्रवीण, भोसले दिपाली सचिन, बेलदरे राणी दीपक, साबळे रेश्मा अजय, गोळे प्रणिता सागर, किवडे मयुरी महेश, जांभळे शुभांगी नितीन, कोंढरे पूजा अनिल आणि मांगडे अर्चना आबासाहेब,

जागा ‘ड’: खोपडे पल्लवी व्यंकोजी, जगताप पल्लवी प्रसाद, जाधव अस्मिता मंगेश, ताठे सारिका संतोष, माने रुपाली अनंत, जाधव गीतांजली गोरखनाथ, वासवंड किशोरी समीर आणि कदम दिपाली अमोल.

जागा ‘इ’: बेलदरे युवराज संभाजी, ओंकार नितीन निवंगुणे, लाड वैभव शिवाजीराव, लिपाने श्रीकांत मारुती, जांभळे नितीन जनार्दन, प्रमोद शिवाजी धुले आणि समीर जयसिंग वासवंड. सर्वच पक्षांच्या बंडखोरांसह बहुतांश अपक्षांनीही अर्ज मागे घेतल्याने प्रभाग क्रमांक ३६,३७,३८ मध्ये ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आता प्रमुख राजकिय पक्षात थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

See also  रयत शिक्षण संस्थेच्या चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयात १९९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा