ईस्टर्न मिडोज, खराडीमध्ये उत्साहात पार पडलेली व्हॉलीबॉल स्पर्धा – ‘तोरणा’ संघाचा विजय

खराडी : ईस्टर्न मिडोज, खराडीमध्ये उत्साहात पार पडलेली व्हॉलीबॉल स्पर्धा – ‘तोरणा’ संघाने विजय मिळविला. ईस्टर्न मिडोज, खराडी येथील रहिवाशांमध्ये एकतेचा आणि खेळाडू वृत्तीचा सुंदर संदेश देणारी व्हॉलीबॉल स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किल्ल्यांची नावे घेऊन तयार करण्यात आलेल्या सहा संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता – तोरणा, पन्हाळा, रायगड, राजगड, प्रतापगड आणि सिंहगड.

सर्व संघांनी आपापली कौशल्यं, एकजूट आणि चिवट प्रयत्न दाखवून सामने अधिकच रंगतदार बनवले. अखेरच्या क्षणांपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात तोरणा संघाने उत्कृष्ट खेळ करून विजेतेपद मिळवले आणि आपले नाव यशस्वीपणे कोरले. तोरणा – विजेता संघ, रायगड – उपविजेता संघ, पन्हाळा – तिसरे स्थान
या स्पर्धेतील खेळाडूंनी सहकार्य, मैत्री आणि कुटुंबवत्सल भावना या मूल्यांचाही आदर्श घालून दिला.या कार्यक्रमासाठी सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक महिला व लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन