कुरकुंभ औद्योगीक वसाहतीत उभारले सव्वातीनशे नवे पथदिवे – राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचा यशस्वी पाठपुरावा

कुरकुंभ : जुने जीर्ण पथदिवे, खड्डेमय रस्ते व झाडं झुडुपात गुदमरलेल्या  कुरकुंभ औद्योगीक वसाहतीला बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचा पाठपुरावा यशस्वी ठरला. नवे सव्वा तीनशे पथदिवे उभारल्यामुळे औद्योगीक वसाहत अनेक वर्षांनी प्रकाशमान झाली. 

राज्यातील अग्रगण्य कुरकुंभ औद्योगीक वसाहत गेली अनेक वर्षे राज्याच्या औद्योगीक क्षेत्राला बळ देत आली आहे. औद्योगीक वसाहत स्थापन झाली उद्योगांनी आपली यशस्वी घोडदौड चालू ठेवली मात्र गेल्या अनेक वर्षांत पुर्वी देण्यात आलेल्या पायभूत सुविधांना सुरक्षित ठेवणे व देखभाल दुरूस्ती करण्याकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या औद्योगीक वसाहतीला घरघर लागली होती. जुने सव्वा तीनशे पथदिव्यांचे खांब जीर्ण व मोडकळीस आले होते. खांब कधीही कोसळून दुर्घटनाही घडण्याची शक्यता होती. निम्म्याहून अधीक पथदिवे बंद होते. अंतर्गत रस्ते उखडले होते. रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. रस्त्याकडेला मोठी झुडुपांची जंगले तयार झाली होती. राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे राज्याचे संघटक व कुरकुंभ निवासी सचिव शामू लोंढे यांनी प्रदेशाध्यक्षाध्यक्ष संदिप लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगीक वसाहतीच्या प्रमुख अधिकार्यांकडे पत्रव्यवहार केला आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. कुरकुंभ औद्योगीक वसाहतीचे उपअभियंता अशोक पाटील व बारामती औद्योगीक वसाहतीचे उपअभियंता सुनिल गायकवाड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी कुरकुंभ औद्योगीक वसाहतीने कात टाकली आहे. या कार्याबद्दल राष्ट्रीय मानव अधिकार सुरक्षा संघ, नवी दिल्ली या संघटनेच्या वतीने औद्योगीक वसाहतीच्या अधिकार्यांना सन्मानचिन्ह देऊन  सन्मानित करण्यात  आले. 

कुरकुंभ औद्योगीक वसाहतीच्या दौंड येथील सभागृहात पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यात प्रदेशाध्यक्ष संदिप लोंढे यांनी मार्गदर्शन केले व संघटनेच्या राज्यभरातील कामाची माहिती दिली. यावेळी संघटनेचे महासचिव बाळासाहेब ढमाले, विधी सल्लागार  ॲड. अजय कपिले,  दौंड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड, लिंगाळीचे ग्रामपंचायत सदस्य दौंड, राजू माने, सामाजिक कार्यकर्ते नवलेश पाटील उपस्थित होते.

See also  कोथरूड येथे कै. शिरीष तुपे यांच्या स्मरणार्थ 31 व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन