सुतारवाडी पाषाण महामार्गालगत अनाधिकृत हॉटेल्स वर कारवाई

सुतारवाडी : सुतारवाडी पाषाण महामार्गालगत असलेल्या अनधिकृत हॉटेलवर पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.

सुतारवाडी येथे महामार्गालगत असलेले अनाधिकृत बार, हॉटेल तसेच अनाधिकृत पत्राचे शेड कारवाई दरम्यान जमीन दोस्त करण्यात आले. हॅप्पी पंजाब, वाडा तसेच महामार्ग लगत असलेले गॅरेज व व्यवसायांचे शेड जेसीबीच्या साह्याने जमीन दोस्त करण्यात आले.

बांधकाम अभियंता सुनील कदम यांच्या नेतृत्वात पालिकेचे अतिक्रमण व बांधकाम अधिकारी तसेच जेसीबी, पोकलेन, पोलीस कर्मचारी अधिक कारवाई मध्ये सहभागी झाले.

See also  मणिपूर जळत असताना मोदींचे मौन का? : आप चा सवालमणिपूर च्या हिंसाचाराच्या विरोधात आपचा आक्रोश मोर्चा