पुणे : महाराष्ट्र शासनाच्या कृषी व उत्पादन मंडळाच्या वतीने आयोजित कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदे मधून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी काढता पाय घेतला. यावेळी महाराष्ट्रातील बाजार समितीच्या सदस्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांचा निषेध व्यक्त केला.
महाराष्ट्रभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांची परिषद पिंपरी चिंचवड येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी पाठ फिरवली यामुळे नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी व कृषी उत्पन्न समितीच्या राज्यभरातील अध्यक्षांनी सरकारचा निषेध व्यक्त केला.
राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार हे उशिरा दाखल होऊन लगेच निघण्याच्या तयारीत असल्याने नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सभागृहातच 50 खोके एकदम ओके च्या घोषणा देत आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर काही वेळातच कृषिमंत्र्यांनी काढता पाय घेतला. सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने हा कार्यक्रम काही काळ थांबवावा लागला.
राज्यस्तरीय परिषदेच्या मागण्यांबाबत कोणतीच भूमिका यावेळी सत्तार यांनी मांडली नाही तसेच मला कॅबिनेट आहे मी जात आहे असे सांगत ते निघून गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
कृषिमंत्र्यांच्या या भूमिकेचा महाराष्ट्रभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्टेजवर येऊन निषेध व्यक्त केला.
घर ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या राज्यस्तरीय परिषदेत मंत्री अब्दुल सत्तार...