पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडल्यानंतर अजित पवार यांनी रविवारी (दि. 21) काळेवाडी येथे कार्यकर्ता मेळावा घेतला. या
मेळाव्यात त्यांनी पक्षातून गेलेल्या पदाधिकार्यांना उद्देशून
‘कुणाचं कुणावाचून नडत नाही’ असा टोला लगावला. तसेच जे दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असतात त्यांनी कुठेतरी एकाच ठिकाणी जा, असे म्हणत कुंपणावरच्या पदाधिकारी,कार्यकत्याना बजावले.
ज्या कार्यकत्र्याची भूमिका स्पष्ट नसेल तर त्यांना समजावून सांगा.कोण काही येऊन सांगत असेल तर यांना फार काही शहराबद्दल जिव्हाळा आहे असं नाही, अजित पवार म्हणजे पिंपरी चिंचवड आहे.कुणाचे कुणावाचून नडत नाही, दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असं काही करू नका. आपल्याच पक्षाकडे राहा. काही जण दिवसा इकडे असतात रात्री तिकडे असतात, अशांनी तिकडे जायचे तर तिकडे जा,असं म्हणत अजित पवारांनी कुंपणावरच्या नेत्यांना टोला लगावला.
डीपीडीसीच्या बैठकीबद्ल अजित पवार म्हणाले –
डीपीडीसी बैठकीमध्ये कोण किती वेळ बोलले आणि अजित पवार यांनी किती ऐकलं याच रेकॉर्ड आहे. पण उगाच सहानुभूती घेण्यासाठी काहीजण म्हणतात की मी साहेबांना बोलू दिलं नाही. अरे मी कसा बोलू देणार नाही, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना चिमटा काढला. मी भेदभाव करणारा नेता नाही, विरोधकांना पण माहिती आहे, काल काही गोष्टी घडल्या, अडीच तास मीटिंग झाली. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह अनेकजण होते. सुप्रिया सुळे म्हणाल्या, की मावळमध्ये जास्त निधी दिला. यावर
शेळके यांनी म्हटलं की तुम्ही सारखा हा उल्लेख करतायत. कुणाला दुखवायचं नाही. मी साहेबांचा अपमान केला नाही, सुप्रिया यांनी म्हटलं मी अपमान केला. हा आरोप म्हणजे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे, असेही अजित पवार म्हणाले.
योजना हव्या असतील तर…
दूध, गँस, लाडकी बहिण योजना यासह इतर सर्व योजना आहेत.यावर सरकार आता 75 हजार कोटी खर्च करत आहे. अजित दादाचा वादा आहे. दादा वाद्याचा पक्का आहे. पण हे सगळं हवं असेल, या योजना हव्या असतील तर परत महायुतीला निवडून द्या. काम कसं
करून घ्यायचे मी बघतो, असेही अजित पवार म्हणाले.
पुणेकरांनो! थोडी कळ काढा
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरु आहे. जिल्ह्यात रिंग रोड आणि अजून काही कामे करायची आहेत. या योजना करता करोडो रुपये लागतात. केंद्राशी काही योजनांबाबत चर्चा झाली आहे.काही कामे सुरु आहेत. वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. पण पुणेकरांनो थोडी कळ काढा, मी कस करतो बघा, असा विश्वास त्यांनी दिला.