पाषाण : पाषाण येथे अपक्ष उमेदवार प्रमोद निम्हण व पूनम विशाल विधाते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यानंतर पाषाण परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली.
या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी पाषाण परिसरातील ग्रामदैवताचे दर्शन घेतले. त्यानंतर विविध भागांतून पदयात्रा काढत नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन संवाद साधण्यात आला. परिसरातील विकास, नागरी समस्या आणि स्थानिक प्रश्नांवर नागरिकांनी आपली मते मांडली.
या वेळी सारिका शंकर मांडेकर व बाळासाहेब मांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक एकनिष्ठ उमेदवारांवर अन्याय करत पक्षाने उमेदवारी डावरल्यामुळे नाराज झालेल्या ग्रामस्थांनी, महिला व युवकांनी अपक्ष उमेदवारांच्या पाठीमागे राहत मोठ्या संख्येने सहभाग घेत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.ही पदयात्रा लमान तांडा येथे सांगता करण्यात आली.


























