चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची दहीहंडी भाजपा आमदारांना आव्हान ठरणार

पिंपरी : पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी थेट आमदारांच्या बाले किल्ल्यात दहीहंडीचा भव्य कार्यक्रम घेत चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाकडे आव्हान निर्माण केले असल्याचे पाहायला मिळत आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणामध्ये शरद पवार व अजित पवार पक्ष फुटल्यानंतर शरद पवार पक्षाची धुरा माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी खासदार शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात हातात घेतली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीचा भव्य मेळावा शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्या नेतृत्वात पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये आगामी निवडणुकांच्या उमेदवारांच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या माध्यमातून चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये शहराध्यक्ष तुषार कामठे तर पिंपरी मतदारसंघातून शीलवंत, तर भोसरी मतदारसंघातून नुकतेच अजित दादा पवार गटाचे प्रवेश केलेले अजित गव्हाणे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

परंपरागत जगताप घराण्याचे वर्चस्व असलेल्या चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीचे व नंतर भाजपाचे वर्चस्व राहिले आहे. या वर्चस्वाला आव्हान देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने थेट सांगवी परिसरातच भव्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात असलेली हजारो युवकांची गर्दी, सांगवी व चिंचवड करांचा मिळालेला प्रतिसाद यामुळे चिंचवड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वर्चस्व वाढत असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी यंदाची विधानसभा लढवावी अशी आग्रही भूमिका जनतेतून कार्यकर्त्यातून मांडली जात असली तरी चिंचवड विधानसभा मतदार संघातून पक्षामध्ये येण्यासाठी इच्छुक असलेल्या दिग्गजांची गर्दी तसेच महाविकास आघाडीच्या वाटपामध्ये जागा कोणाला सुटणार याबाबत राजकीय वर्तुळात सातत्याने उत्सुकता पाहायला मिळत आहे. तसेच नवे तर्क देखील मांडले जात आहे.

दहीहंडीच्या निमित्ताने माजी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे   कार्यकर्ते अमित पसरणीकर, धनंजय ढोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उपक्रमात तुषार कामठे यांच्या सोबत सहभागी होताना दिसल्याने अनेक विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पडद्या कालावधीमध्ये शहराची धुरा संभाळणारे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्यावर पक्षाने विधानसभा लढवण्याची जबाबदारी टाकल्या त्यांना ती पार पाडावी लागेल या भूमिकेतून सध्या सुरू असलेली तयारी पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणाला वेगळी दिशा देणार हे मात्र निश्चित मानले जात आहे.

See also  भविष्यातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी लवकरच देशातील २० नद्या एकमेकांशी जोडणार - केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील