पुणे : भारतीय स्वातंत्र्याचा “अमृत महोत्सव” चे औचित्य साधून भारतीय हवाई दलाचा “भारतीय हवाई दल दिवस ” साजरा करताना डिफेन्स फोर्स लिग या संस्थे द्वारा भारताचा अभिमान सन्मान पुरस्कार” २०२३ वितरण संमारंभ ” चिंचवड येथे साजरा झाला.
परमवीर चक्र विजेते सुभेदार मेजर श्री संजय कुमार या पराक्रमी वीरांच्या शुभहस्ते डॉ.विद्यावाचस्पती नंदकिशोर रमाकांत एकबोटे यांना हा पुरस्कार देण्यात आला.
या प्रसंगी डिफेन्स फोर्स लिगचे प्रमुख समन्वयक”श्री निलेश कुमार “, पद्मश्री मा.मुरलीधर पेटकर साहेब , संस्थापक मा.श्री नरेश जी गोल्ला साहेब ,मा.डॉ .ए .के . सिन्हा साहेब (इस्त्रो शास्त्रज्ञ ),मा.सिद्धराम जी बिराजदार साहेब आणि मा .श्री सावंत साहेब ( DFL संस्थेचे समन्वयक ) आणि पूर्व सैनिक अधिकारी (११जण) उपस्थित होते.
विद्यावाचस्पती डाॅ नंदकुमार एकबोटे यांच्या विविध सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. ” महाराष्ट्रातील निवडक संस्थानांमधील स्थापत्य, प्रशासकीय कार्य-यंत्रणा आणि सांस्कृतिक स्थित्यंतरे यांचा अभ्यास”या वर त्यांनी पी एच डी केली आहे.
तसेच भारताच्या सुरक्षतेसाठी बलिदान देण्यार्या सैनिकांच्या शौर्यकथा पाठ्यपुस्तकात समाविष्ट कराव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केले आहेत.
प्रतिवर्षी १०,००० राख्या जवांनासाठी पाठविण्याचे कार्य ते गेली कित्येक वर्ष करत आहेत. याशिवाय त्यांनी दिव्यांगासाठी बुद्धिबळाच्या स्पर्धेचे आयोजन केले.
या कार्याचा गौरव स्वीकारताना डाॅ एकबोटे यांनी कृतार्थतेची भावना व्यक्त केली व असेच कार्य सतत चालु राहिल असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पॅराकमांडो रघुनाथ सावंत यांनी केले व सुत्रसंचलन डिफेन्स फोर्स लिगचे प्रमुख समन्वयक श्री निलेश कुमार यांनी केले.