ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षपदी ॲड.एस.ओ. माशाळकर यांची निवड

बालेवाडी : पुण्यातील ज्येष्ठ नागरिक संघांच्या महासंघाची एसकेपी कँपस बालेवाडी येथे आयोजित जेष्ठ नागरिक संघांच्या सभे मध्ये करण्यात आली. सध्या ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य विषयक, कौटूंबीक हिंसाचार, सरकारी सवलती न मिळणे या प्रकारच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या सोडविण्यासाठी नवीन स्थापन झालेला ज्येष्ठ नागरिक महासंघ प्रयत्नशील असेल असे विचार महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष ॲड.एस.ओ. माशाळकर यांनी व्यक्त केले.


या सभेमध्ये खालील कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
अध्यक्ष – ॲड.एस.ओ. माशाळकर
उपाध्यक्ष – श्री.हरिष पाठक
कार्याध्यक्ष – श्री. पद्माकर पुंडे
उपकार्याध्यक्ष – श्री.गणपतराव बालवडकर
सचिव – श्री. सुर्यकांत कलापुरे
उपसचिव – श्री.दिलीप कुलकर्णी
खजिनदार – श्री.शरद जाधव
उपखजिनदार – डाॕ.जनार्दन कदम
कार्यकारिणी सदस्य –
श्रीमती रेखा मसुरकर आणि सुजाता लिमये
मार्गदर्शक – डाॕ.आर.टी. वझरकर
शेवटी ॲड. एस.ओ. माशाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

See also  औंध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उघड्यावरच जाळाला जातोय ठिकठिकाणी कचरा