शास्त्रीनगर कोथरूडमध्ये  प्रभाग क्रमांक दहा ड्रेनेज लाईनची दुरवस्था, दुरुस्तीची काँग्रेसची मागणी

कोथरूड : शास्त्रीनगर कोथरूडमध्ये  प्रभाग क्रमांक दहा ड्रेनेज लाईनची दुरवस्था, नागरिकांच्या घरांमध्ये मैला आणि घाण पाणी जात आहे . यावेळी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त दुदुस्कर यांना काँग्रेसचे किरण आढागळे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

शास्त्रीनगर भागामध्ये चेंबरची आणि लाईनीचे  अवस्था खूप देनीय झाले आहे. चेंबरचं लाईनीचे पाणी नागरिकांच्या घरांमध्ये घुसत आहे. आणि त्या पाण्यामुळे भिंती खसल्या आहे, तसेच त्या घाण साम्राज्यामुळे लहान मुले वयस्कर लोक आजारी पडत आहे. लवकरात लवकर, चेंबर लाईनीचे दुरुस्ती करून द्यावी नाहीतर नागरिकांतर्फे आणि काँग्रेस तर्फे एक उग्र आंदोलन करावे लागेल.
यावेळी किरण आढागळे ,अशोक कांबळे, नितीन बनसोडे आदी उपस्थित होते.

See also  बाणेर मुळा नदी किनारी छठ पुजा उत्साहात साजरी