कोथरूड मधून अमोल बालवडकर यांची माघार ; सर्वांनी एकजुटीने काम करुन चंद्रकांतदादा पाटील यांना विजयी करु- अमोल बालवडकर

बालेवाडी : कोथरूड विधानसभा मतदारसंघातून अमोल बालवडकर यांनी माघार घेतली असून, सर्वांनी एकजुटीने काम करुन चंद्रकांतदादा पाटील यांना विजयी करायचे आहे, असा निर्धार यावेळी अमोल बालवडकर यांनी व्यक्त केला.

बालेवाडी येथील बालवडकर यांच्या निवासस्थानी चंद्रकांत दादा यांनी जाऊन भेट घेतली यावेळी योगीराज नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, गणेश कळमकर, लहू बालवडकर,प्रल्हाद सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, राहुल कोकाटे, अनिल बालवडकर, राजेंद्र मुरकुटे, मोरेश्वर बालवडकर, यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

गेले काही आठवडे कोथरूडच्या राजकारणामध्ये अमोल बालवडकर विरुद्ध चंद्रकांत दादा पाटील असा संघर्ष सातत्याने चर्चेत होता याला अखेर आज पूर्णविराम मिळाला आहे. वरिष्ठ नेतृत्वाच्या मध्यस्थीनंतर अमोल बालवडकर यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. चंद्रकांत दादा पाटील यांचा सत्कार करत त्यांना शुभेच्छा व्यक्त केले. यावेळी दादांनी अमोल बालवडकर यांच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांना पेढा भरवला.

यामुळे कोथरूड मधील भाजपाचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे उमेदवार किशोर शिंदे यांच्यात होणारी लढत प्रचारादरम्यान उपस्थित होणारे राजकीय मुद्दे सध्याच्या राजकारणात त पाहायला मिळणार आहेत.

See also  कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मदतीसाठी सहकार्य करु – राज्यपाल रमेश बैस