भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने सुसगाव येथे स्वच्छता अभियान

पुणे: पुण्यातील भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सुसगाव येथील विविध सोसायटी,शाळा परिसर,तसेच रस्त्यावरील कचरा गोळा करत हातात स्वच्छता जनजागृती करणारे संदेश फलक घेऊन स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या घोषणा देत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून परिसर स्वच्छता करण्यात आली.


भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिवलाल धनकुडे यांच्या संकल्पनेतून सामाजिक दायित्व भावनेतून एक तास स्वच्छतेसाठी या उपक्रमामध्ये सुसगाव माजी सरपंच नारायण चांदेरे,पीडीसी बँक उपाध्यक्ष सुनील चांदेरे, शिवसेना महिला शहराध्यक्षा ज्योतीताई चांदेरे,नेताजी गाडेकर,सामाजिक कार्यकर्ते सनी सुतार,बाणेर युथ सोशियल फाऊंडेशन अध्यक्ष राहुल धनकुडे,भैरवनाथ शिक्षण संस्थेचे सचिव विराज धनकुडे,कार्यकारी संचालक सुषमा भोसले, प्राचार्या रेखा काळे,कोमल शिंदे,सुस शाखेच्या प्रमुख करुणा यादव यादी उपस्थित होते.
शाळेतील इयत्ता ६ वी ते १२ वी चे विद्यार्थी तसेच संस्थेच्या शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुनील चांदेरे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्वच्छतेप्रति जागरूक राहावे, तसेच महात्मा गांधींनी दिलेली स्वावलंबनाची शिकवणीचा अवलंब करावा.स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून केली तर सामाजिक बदलाची प्रक्रिया सुरू होईल.बदल हा फक्त बोलुन होत नाही तर कृतीतून होत असतो.
भैरवनाथ शिक्षण संस्थेचे माध्यमातून आयोजित केलेल्या स्वच्छता अभियान या उपक्रमाचे कौतुक वाटतं संस्थेचे वतीने कायमच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

See also  आजच्या युगात उद्योग व्यवसायाच्या भरपुर संधी उपलब्ध आहेत त्याचा फायदा घ्या आणि उद्योजक बना: संपादक संजय आवटे