बालेवाडी : बालेवाडी येथे वास्तव्यास असणार्या सर्व मराठवाड्यातील सर्व बंधु-भगिनिंच्या उपस्थितीत जिंतुर-सेलु मतदार संघातुन प्रचंड बहुमताने आमदार पदी निवडून आल्याबद्दल नगरसेवक अमोल बालवडकर व भाजपा नेते लहुशेठ बालवडकर यांच्या वतीने सौ.मेघनाताई बोर्डीकर यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सौ.आशाताई बालवडकर व समस्त मराठवाडा मित्र परिवाराच्या वतीने सौ.मेघनाताई बोर्डीकर यांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच मराठवाड्यातील बंधू-भगिनींचे आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी आभार मानले.
यावेळी सौ.आशाताई बालवडकर, अनिलतात्या बालवडकर, लहुशेठ बालवडकर, सागर बालवडकर, सुभाष भोळ, सुमित कांबळे, अरविंद सिंग, मराठवाडा सामाजिक फाऊंडेशनचे सभासद तसेच मराठवाड्यातील बंधु-भगिनी व ग्रामस्त उपस्थित होते.