पाषाण : कृष्णगंगा सोशल फाउंडेशन च्या तृतीय वर्धापन दिनानिमीत्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण व संसदीय कार्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी पुणे शहराचे माजी महापौर व सरचिटणीस भाजपा महाराष्ट्र राज्य मुरलीधर आण्णा मोहोळ उपस्थित होते. तसेच या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मान्यांवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ह.भ.प.मारुती कोकाटे,ह.भ.प पोपटराव जाधव,दिलीप रणपिसे,राहुल कोकाटे ,नितीन निम्हण, लहू बालवडकर, शिवम सुतार,सचिन दळवी , राजेंद्र सुतार,नवनाथ ववले तसेच कोकाटे तालिम मंडळ व कृष्णगंगा सोशल फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी 204 कोण अधिक नागरिकांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.