यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव मावळ चे घवघवीत यश

खामगाव मावळ, पुणे: पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत वरदाडे केंद्राच्या केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव मावळच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करून घवघवीत यश मिळवले. या स्पर्धांचे उद्घाटन पंचायत समिती हवेली चे माजी उपसभापती किसन बापू जोरी यांच्या हस्ते मालखेड येथे करण्यात आले.

खामगाव मावळ शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्कृष्ट परफॉर्मन्स देऊन विविध स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. यशाच्या शिखरावर असलेल्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश पुढीलप्रमाणे:

लेझिम संघ: प्रथम क्रमांक
आर्यन मन्हेरे: उंच उडी प्रथम क्रमांक
हीरण्या वालगुडे: उंच उडी प्रथम क्रमांक
स्वरा सोनवणे: लांब उडी प्रथम क्रमांक
स्वरा सोनवणे: 50 मीटर धावणे द्वितीय क्रमांक
आदित्य थोपटे: लांब उडी द्वितीय क्रमांक
शौर्य थोपटे: 50 मीटर धावणे तृतीय क्रमांक


कार्यक्रम प्रसंगी मालखेड गावच्या प्रथम नागरिक मा. नंदा जरी आणि वरदाडे केंद्राच्या केंद्रप्रमुख प्रमिला बोऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापक श्री. उमेध धावारे आणि त्यांच्यासोबत कार्यरत शिक्षक व शिक्षिकांना दिले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी क्रीडांगणावर परिपूर्ण कामगिरी केली.

यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रीडाशक्तीची आणि कौशल्याची जोपासना करण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे, आणि त्यांचा हा यशस्वी प्रवास त्यांच्यासाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे.

See also  पीपीएम बालशिक्षण मंदिरात पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत