शालेय बसचे ऑडिट होणे गरजेचे -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे –  विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बसचे ऑडिट त्वरीत व्हावे आणि शालेय कर्मचाऱ्यांना आग प्रतिबंधक प्रशिक्षण दिले जावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज नागपूर येथे विधानसभेत बोलताना केली.

औचित्याचा मुद्दा उपस्थित करून आमदार शिरोळे यांनी पुण्यातील शालेय बसचा विषय सरकारसमोर मांडला. विद्यार्थ्यांना शाळेतून ने-आण करणाऱ्या बसला आग लागल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना पाहता शालेय बस आणि व्हॅनच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित झाला आहे, असे शिरोळे यांनी बोलताना सांगितले.

पुण्यात ८ हजारहून अधिक शालेय बस आणि व्हॅन आहेत. या सर्व बसगाड्यांचे आणि व्हॅन्स चे ऑडिट होणे गरजेचे आहे, असे आ.शिरोळे यांनी सांगितले.

शालेय बस गाडीला आग लागल्यास कोणत्या उपाययोजना करायच्या? याचे प्रशिक्षण पुणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून दिले जावे. तसेच बस गाडीमध्ये आग विझवणारी यंत्रणा किती असावी? कुठे बसवली जावी? त्याचा वापर कसा केला जावा? विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर कसे काढावे? याचे प्रशिक्षण शालेय कर्मचाऱ्यांना देण्यात यावे याकरिता सरकारने महापालिकांना निर्देश द्यावेत, अशी मागणी शिरोळे यांनी केली.

See also  व्यवस्थेतील भ्रष्टाचारामुळे देशात घुसखोरीला प्रोत्साहन - ॲड. अश्विनीकुमार उपाध्याय