पी एम पी एल च्या धडकेत सात गाई जागेवरच गतप्राण तर सात गंभीर जखमीःकोंढणपूर येथील घटना

खडकवासलाः कोंढणपूर सिंहगड रस्त्यावर अवसरवाडी येथे आज सकाळी साधारण सात वाजताच्या सुमारास शेतामध्ये चरायला निघालेल्या गीर गायींच्या  कळपास एका पुणे महानगर परिवहनच्या  (पीएमपीएल) बसने बेदरकारपणे धडक दिल्याने सात गायी जागेवर गतप्राण झाल्या तर सात ते आठ गायी जखमी झालेल्या आहेत. पळून जाणाऱ्या माथेपफीरू बस चालकास ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. यात गोपालन करणाऱ्या शेतकऱ्याचे 14 ते 15 लाखाचे नुकसान झाले आहे. दुपारपर्यंत पोलिसांचे पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते. पीएमपीएल च्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. तर पोलिसांनी बस चालक अशोक पांडुरंग पवार (वय 38) याचेवर  गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.

सिंहगड पायथ्याच्या कोंढणपूर पंचक्रोशीतील अवसरवाडी येथील गोपालन करणारे शेतकरी तुकाराम नामदेव मुजुमले यांचा मुलगा अजय मुजुमले नेहमीप्रमाणे गायींना शेतात चारण्यासाठी घेऊन जात होता. याच वेळी कात्रज कडे निघालेल्या भरधाव बसने (एम एच 12 आर एन 6069) गायींच्या कळपास बेदरकारपणे जोरदार धडक दिली या धडकेत कळपातील तीनचार गाय जागेवरच गतप्राण झाल्या तर चार गायींची परिस्थिती अत्यंत चिंताजनक होती. तर अजून सात ते आठ गायी जखमी झाल्या आहेत. कळपात एकूण 35 गाय होत्या. गोपालक शेतकरी अजय मुजुमले यांनी सांगितले.

पी एम पी एल च्या बसने गायीच्या कळपास धडक दिल्यानंतर रस्त्यावरील चित्र खूप भयानक दिसत होते. मुके प्राणी गतप्राण होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर जखमी गाई उठण्यासाठी धडपडत होत्या. या गायांमधील काही गाय गाभण होत्या. मन हे लावणाऱ्या या घटनेने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

सदर अपघातात अजय जुमले यांच्या सहा ते सात गायी दगावल्या असून सात गायी जखमी आहेत. पोलिसांनी पंचनामा केला असून पीएमपीएल प्रशासनाने स्थळ पाणी केली आहे. शेतकऱ्याचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात येईल.
सतीश गव्हाणे
व्यवस्थापक, पुणे महानगर परिवहन ( पीएमपीएल)

बस चालक अत्यंत  बेदरकारपणे या रस्त्यावर गाड्या चालवतात. त्यांना कोणतीही शिस्त आणि वेगाची मर्यादा नसते, असे येथील स्थानिक नागरिक सांगतात. अशा बस चालकांवर प्रशासनाने वेळीच कारवाई केली तर असे होणारे अपघातास आळा बसेल असे ग्रामस्थांनी सांगितले.

गीर आणि सेहवाल या दुर्मिळ जातीच्या गायींचे पालन पोषण  करत आहोत. पी एम पी एल च्या अपघातात आत्तापर्यंत सात गायी दगावल्या आहेत. तर सात गाई गंभीर जखमी आहेत या अपघातामुळे साधारण 15 लाखाचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने  त्वरित नुसकान भरपाई द्यावी.
अजय तुकाराम मुजुमले, गोपालक शेतकरी

See also  शिवसेनेचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात पुण्यात रास्ता रोको आंदोलन व निदर्शने.