साहित्य संमेलनासाठी पुण्यातून विशेष रेल्वे

पुणे: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दि.१९ फेब्रुवारी रोजी विशेष रेल्वे गाडी पुण्यातून सोडण्यात येणार आहे.

विशेष रेल्वे सेवा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांमुळे उपलब्ध झाली आहे. विशेष रेल्वेसाठी तिप्पट दर असतो, मात्र, त्यात सवलत मिळावी यासाठी संमेलनाचे स्वागताध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार प्रयत्नशील आहेत, अशी माहिती संमेलनाचे आयोजक संजय नहार यांनी सांगितली.

संमेलनासाठी सोडण्यात येणारी रेल्वे गाडी १७ डब्यांची स्लिपर क्लास गाडी आहे. ती १९ फेब्रुवारीला पुण्यातून सुटेल, २० फेब्रुवारीला दिल्लीत पोहोचेल. जळगाव आणि ग्वाल्हेर अशा दोन स्टेशन्सवर ती थांबेल.

या रेल्वे गाडीचा परतीचा प्रवास २३ फेब्रुवारी रोजी रात्री सुरू होणार असून २४ फेब्रुवारी रोजी ती पुण्यात येईल. परतीच्या प्रवासात मनमाड आणि भोपाळ या स्टेशन्सवर ती थांबणार आहे.

प्रवाशांना दीड हजार रुपये भरून नोंदणी करावी लागेल. नोंदणी ‘सरहद’ पुणे कार्यालय, धनकवडी आणि साहित्य परिषद, पुणे कार्यालय, टिळक रोड येथे करता येईल. फोन नंबर्स याप्रमाणे ७३९८९८५६ आणि ८४८४०५५२५२ या नंबरवरही नोंदणी उपलब्ध आहे.

See also  आम आदमी पार्टीतर्फे डॉ अभिजीत मोरे कोथरुड विधानसभा निवडणूक लढवणार