पाठशाळा बाणेर आणि सुसच्यावतीने गांधी जयंती मोठ्या  उत्साहात साजरी

सुस : पाठशाळा बाणेर आणि सुसच्या विद्यार्थ्यांनी गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. मुलांना महात्मा गांधींचे जीवनमूल्य आणि जीवन याविषयी अधिक माहिती मिळावी यासाठी वर्गनिहाय विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले होते.

सिनिअर केजी वर्गाने गांधीजींचे चौथे माकड, सत्य प्रश्नमंजुषा आणि दांडीयात्रेची भूमिका असे काही मजेदार उपक्रम आयोजित केले. ज्युनियर केजीच्या विद्यार्थ्यांना गांधीजींची वेषभूषा करण्यास, गांधीजींनी वापरलेल्या गोष्टी दाखवण्यास व समजावून सांगण्यास सांगितले. मुलांनी आपले वर्ग आणि शाळे जवळील बागेची स्वच्छता मोठया उत्साहाने केली. कथा सांगण्याच्या सत्रात नर्सरी आणि प्ले ग्रुपच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. पाठशाळेच्या संचालिका श्रीमती अबोली रुईकर यांनी सर्व मुलांचे आणि रंगकर्मींचे सक्रिय सहभागाबद्दल अभिनंदन केले.

See also  कौशल्य विकासाद्वारे युवकांची भविष्याकडे वाटचाल – राज्यपाल रमेश बैस