ऊस तोडणी मशीन मालक संघटनेच्या धरणे आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा

मुंबई : आझाद मैदान येथे राज्यातील ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे ऊस तोडणी मशिनच्या प्रलंबित अनुदानाच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे.
राज्यातील जवळपास ९०० हून अधिक ऊस तोडणी मशिनधारकांनी ५ एप्रिल पासून या आंदोलनास सुरवात केली आहे. सदर तोडणी मशिनधारकांना अनुदान न मिळाल्याने ऊस तोडणी मशीन मालक आर्थिक अडचणीत आले आहेत. या आंदोलनस्थळी भेट देऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.

See also  मांजरी परिसरातील विविध समस्यांबाबत निवेदन