रस्त्यावर पडलेल्या अनाधिकृत केबल वर कारवाई करावी तसेच अनधिकृत केबल टाकणाऱ्या कंपन्यांकडून दंडाचे रक्कम वसूल करावी

बाणेर : बाणेर बालेवाडी परिसरामध्ये अनाधिकृत केबलचे मोठ्या प्रमाणात जाळे असून पुणे महानगरपालिकेचा करोडो रुपयांचा इंटरनेट कंपनीकडून बुडवला जात आहे. तसेच अनधिकृत केबल कारवाईनंतर रस्त्यांवरच पडत असल्याने पादचारी नागरिक व वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

बाणेर पाषाण लिंकरोड , मुख्य बाणेर रस्ता, पासपोर्ट कार्यालयासमोर , औंध डीपी रोड आधी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विजेच्या खांबावरून तसेच झाडांवरून केबल टाकण्यात आले आहे. या अनधिकृत केबलवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई होणे अपेक्षित आहे परंतु अनधिकृत केबल टाकणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने केबलचे जाळे वाढल्याचे दिसून येत आहे.

महानगरपालिकेच्या विद्युत खांबांवर असलेल्या केबलवर केबल तोडण्याची कारवाई होते परंतु या अनधिकृत कंपन्यांना कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येत नाही. यामुळे काही तासातच पुन्हा नव्याने केबल टाकल्या जातात. अनाधिकृत केबल टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे धोरण निश्चित करावे तसेच अनाधिकृत केबल द्वारे सुविधा घेणाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

See also  भाजपने दरवेळी नवा जाहीरनामा दिला -माधव भांडारी