नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई, दि.८: नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्रामध्ये असलेल्या पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने यांमुळे औद्योगिक गुंतवणुक राज्यात वाढत असून उद्योगांना जलदगतीने परवानग्या देण्यासाठी देखील राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्यातील विकास प्रकल्पांना निती आयोगाच्या माध्यमातून सहकार्य असेच कायम ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

राज्यात मध्यम, लघु, अतिलघु उद्योगांना गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. उद्योग वाढीसाठी चांगल्या पायाभूत सुविधा, संपर्क साधने, कुशल मनुष्यबळाची उपलब्धता असून गुंतवणूकवाढीला चालना देण्यात आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येत असून पुढील दोन वर्षांत खड्डे मुक्त मुंबई करण्याचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्य सचिव मनोज सौनिक, ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त वभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय यावेळी उपस्थित होते.

See also  तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान