औंध येथे संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच्या मंजुरी पत्राचे वाटप

औंध येथे संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच्या मंजुरी पत्राचे वाटप प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे व माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण

औंध : संजय गांधी निराधार पेन्शन योजनेचे मंजुरी पत्र वाटप आमदार सिद्धार्थ शिरोळे व माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
काही कार्यसम्राट आमदार विनायक महादेव निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त जमा केलेला हजारपैकी 100 नागरिकांना प्रत्यक्ष योजनेचा लाभ होऊन त्यांना मंजुरी पत्रकाचे वाटप या कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.


यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, माझी नगरसेवक सनी विनायक निम्हण, माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, आनंद छाजेड, बाळासाहेब रानवडे, अमित मुरकुटे, वसंत जुनवणे, प्रमोद कांबळे,वनमाला कांबळे, लता धायगुडे, सुभद्रा कुंभार, उमेश वाघ, उपेश सोनवणे, विशाल शिंदे ,सचिन मानवतकर, टिंकू दास, संजय तरडे, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद कांबळे यांनी इंदिरा वसाहत औंध येथे करण्यात आले होते. यावेळी कस्तुरबा इंदिरा वसाहत परिसरातील निराधार नागरिक व महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश वाघ यांनी केले तर आभार वनामाला कांबळे यांनी व्यक्त केले.

See also  मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील