अफगाणिस्तान व पाकिस्तानात भूकंपाचे हादरे!

मुंबई : मध्यपूर्व आशियातील देशांसह दिल्ली हि या भूकंपाच्या धक्यांनी हादरले.अफगाणिस्तानात या भूकंपाचे केंद्र होते. काल रात्री सव्वा दहाच्या सुमारास जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. या सर्व भागातील नागरिक भीतीपोटी रस्त्यावर आले व उर्वरित रात्र रस्त्यावरच काढल्याचे कळते.
या भूकंपाची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल इतकी असल्याने काही सेकंदापर्यंत भूकंपाचे हादरे जाणवत होते.
पाकिस्तान, अफगाणिस्तान भागात घरांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.
अफगाणिस्तानच्या हिंदू कुश पर्वत रंगांच्या दरम्यान भूकंपाचे केंद्र होते. ANI च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानात ९ तर अफगाणिस्तानात एका मुलासह २ जणांचा मृत्यू झाला आहे.

See also  गणपतराव बालवडकर यांचा अभिष्ठचिंतन सोहळा उत्साहात साजरा