राज ठाकरेंनी सांगितले आपल्या आवडत्या अभिनेत्रींचे नाव.

मुंबई : लोकमान्य सेवा संघातर्फे शतकपूर्ती निमित्त आयोजीत ‘कलात्मक मनाचे कवडसे’ या
मुलाखतीच्या कार्यक्रमात राज ठाकरेंशी विविध विषयांवर गप्पा झाल्या.
गुडीपाडव्याच्या मुंबईतील सभे आधी झालेल्या या मुलाखतीत राज ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केले.
आपल्या कॉलेज जीवनापासून ते सुरुवातीच्या करियर संबंधितअनेक विषयांवर राज ठाकरे बोलले. राजकारणापासून कोणतीही गोष्ट अलिप्त नाही त्यामुळे नवीन पिढीने राजकारणात यावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थीवर बोलताना ते पुढे म्हणाले कि आजच्या सारखी राजकीय परिस्थिती मी काही अनुभवली नाही.अगदी वीट यावा अशी परिस्थती आहे. मी या अशा राजकारणात मिस फिट आहे असे वाटते असे राज ठाकरे म्हणाले. ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले देशाला अनेक वेळा मार्गदर्शन केले त्या महाराष्ट्रावर हि असले राजकारण पाहण्याची वेळ यावी हे दुर्दैव आहे.
राजकारण व्यतिरिक्त विषयांवर बोलताना आपली आवडती नाती कोण या प्रश्नाला उत्तर
देताना हेमा मालिनी असे सांगितले.

See also  पुणे लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज