पुणे : राज्य सरकारने रेडी रेकनर दरात वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात ५.९५ % तर ग्रामीण भागात ३.३६% वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारने रेडिरेकनर दरांत सरासरी ४ टक्के वाढ केली आहे.
१ एप्रिल पासून नवी दरवाढीचे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार पुण्यात आणि पिंपरी चिंचववडमध्ये घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रांत सरासरी सहा टक्के वाढ करण्यात आली आहे. मुंबईत ३.३९, पुण्यात ४.१६, पिंपरी चिंचवडमध्ये ६.६९ तर ठाण्यात ७.७२ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. मुंबई महापालिका वगळता महापालिका क्षेत्रांत सरासरी ५.९५ टक्के वाढ करण्यात आली आहे. रेडिरेकनरच्या दरात वाढ केल्याने मालमत्तांचे दर वाढणार असून, मालमत्ता खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे.
दरम्यान, कोरोनामुळे १ एप्रिल २०२० या आर्थिक वर्षात रेडीरेकनरच्या दरांत वाढ करण्यात आली नव्हती. त्यानंतर २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेडीरेकनर दरात वाढ झाली होती. चालू आर्थिक वर्षांत नोंदणी व मुंद्राक शुल्क विभागाने ५५ हजार कोटींचे उपत्नाचे उद्दिष्ठ ठेवले होते. ३० मार्चपर्यंत ५७ हजार ४२२ कोटी रुपयांचा महसूल खरेदी विक्रीतून जमा झाला आहे. तर 30 मार्चपर्यंत २९ लाख १२ हजार ७८३ दस्त नोंदणी करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये रेडी रेकनर दरवाढ….
पुणे — ४.१६
पिंपरी-चिंचवड — ६.६९
ठाणे — ७.७२
मीरा भाईंदर — ६.२६
कल्याण- डोंबिवली — ५.८४
नवी मुंबई —- ६.७५
उल्हासनगर — ९.००
भिवंडी- निजामपूर — २.५०
मालेगाव — ४.८८
धुळे — ५.०७
जळगाव — ५.८१
अहिल्यानगर— ५.४१
छत्रपती संभाजीनगर — ३.५३
नांदेड वाघाळा — ३.१८ लातूर — ४.०१
परभणी — ३.७१
जालना — ४.०१
नागपूर — ४.२३
नागपूर एनएमआरडीए — ६.६०
कोल्हापूर —- ५.०१
चंद्रपूर —- २.२०
इचलकरंजी — ४.४६
चंद्रपूर म्हाडा —- ७.३०
सोलापूर — १०.१७
अमरावती — ८०३
नाशिक — ७.३१. अकोला — ७.३९
वसई विरार — ४.५०
पनवेल — ४.९७
सांगली-मिरज-कुपवाड — ५.७०