‘‘ सोनिया गांधी व राहुल गांधी वरील ईडीची कारवाई राजकीय सुडबुद्धीनेच.’’- अरविंद शिंदे

पुणे : केंद्रातील भाजपचे नरेंद्र मोदी सरकार काँग्रेस नेत्या  खा.‌ सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर सक्त वसुली संचालनालयामार्फत (ईडी) दबाव आणून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अन्यायाविरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, पुणे येथे आंदोलन करण्यात आले.

     यावेळी बोलताना अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘मोदी शासनाने द्वेषपूर्ण भावनेतून व सूडबुद्धीने नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता मनमानी पध्दतीने जप्त केली. तसेच खा. सोनिया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व इतर ज्येष्ठ नेतेमंडळी विरूध्द सत्तेचा दुरूपयोग करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्याचा मोदी सरकारचा निर्णय हा लोकशाही परंपरेला घातक आहे. अन्यायकारक निर्णयाच्या विरूध्द आम्ही लक्षा देण्याचे ठरविले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये मुद्दामून नाव बदनाम करून खोट्या गुन्ह्यात अटक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असून पक्षाचा कार्यकर्ता कदापी शांत राहणार नाही, या विरोधात रस्त्यावर उतरून मोदी सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्याचे काम काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येथून पुढे करतील मोदी सरकारने चूकीच्या पध्दतीने राहुलजी गांधी यांना अटक करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मोठ्या  प्रमाणावर रस्त्यावर उतरून निषेध नोंदविला जाईल.’’

     यावेळी माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, वीरेंद्र किराड, संजय बालगुडे, मुख्तार शेख, गोपाळ तिवारी, नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, अविनाश बागवे, मेहबुब नदाफ, कैलास गायकवाड, प्राची दुधाने, स्वाती शिंदे, प्रियंका रणपिसे, अनिता धिमधिमे, प्रियंका मधाळे, कांचन बालनायक, सुंदर ओव्‍हाळ, ॲड. राजश्री अडसूळ, शिवानी माने, उषा राजगुरू, ज्योती परदेशी, शारदा वीर, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, हेमंत राजभोज, विशाल जाधव, अक्षय माने, अजित जाधव, राज अंबिके, वाल्मिक जगताप, प्रवीण करपे, सतिश पवार, रवि आरडे, द. स. पोळेकर, चेतन अगरवाल, भगवान कडू, हर्षद हांडे, राजेंद्र नखाते, लतेंद्र भिंगारे, अक्षय जैन, वैभव डांगमाळी, मतीन शेख, देवीदास लोणकर, रवि पाटोळे, संदिप मोकाटे, अक्षय बहिरट, चेतन पडवळ, अविनाश अडसूळ आदींसह असंख्य काँग्रेस कार्येकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

See also  राष्ट्रीयत्वाच्या विचारांचे संस्कार देशभक्तीपर समुहगीत स्पर्धेतुन होतात- मा.खा.मेधाताई कुलकर्णी