धायरी : भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर अविरत लढणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि देशाची अखंडता कायम राखण्याचा संदेश देण्यासाठी धायरीत तिरंगा अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
धायरी ग्रामस्थांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन सैनिकांना सलाम केला.जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कठोर कारवाई सुरू केली आहे. या तणावपूर्ण काळात सैनिकांना पाठबळ देण्यासाठी उंबऱ्या गणपती चौकात सकाळी युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला. तिरंगा हातात घेऊन ‘जय हिंद’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी वातावरण गाजलं. देशभक्तीपर गीते लावून भारतीय ध्वज फडकवले. आमचे जवान देशासाठी जीव धोक्यात घालून लढत आहेत. या तिरंगा अभिवादनातून आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश नागरिकांनी दिला.
या कार्यक्रमाचे संयोजन संदिप पोकळे यांनी केले. यावेळी श्रीरंग चव्हाण पाटील, मिलिंद पोकळे, सुशांत पोकळे , संदीप चव्हाण , कुणाल पोकळे, सोनाली पोकळे , सचिन बेनकर, तुषार पोकळे, राजाभाऊ शिणारे, गणेश कदम, भगवान गायकवाड, भीमराव पोकळे, हर्षद गायकवाड, अक्षय रायकर, आदींसह नागरिक उपस्थित होते.