बाणेर : काही दिवसांपूर्वी बालेवाडी येथे संस्कृती होम्स सोसायटीच्या गार्डला दोन तीन डिलिव्हरी बॉयने केलेल्या मारहाणी बाबत बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या सदस्यांनी वरीष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, बाणेर पोलिस स्टेशन यांची भेट घेतली व निवेदन दिले.
यापूर्वीही पार्कलॅंड सोसायटीत असा प्रकार घडला होता. यावर नागरिकांनी काळजी व्यक्त केली.असा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी पोलिसांनी पाऊले उचलावीत अशी मागणी फेडरेशन तर्फे करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंद्रशेखर सावंत यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माहिती देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.असा प्रकार भविष्यात होऊ नये म्हणून पोलिस काळजी घेतीलच पण नागरिकांनी देखील काय काळजी घ्यावी याबद्दल त्यांनी सांगितले.
बाणेर पोलिस स्टेशन आणि बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन तर्फे लवकरच बाणेर-बालेवाडी येथील नागरिकांसाठी पोलिस -नागरिक संवादाचे आयोजन केले जाणार आहेत. यात अधिक माहिती दिली जाईल असेही सावंत साहेबांनी सांगितले.