पत्रकार परिषदेतुन राहुल गांधींचा मोदी व अदानी संबंधांवरुन पुन्हा प्रश्न उपस्थित.

नवी दिल्ली : अदानी समुहातील २०,००० कोटींच्या बेनामी गुंतवणुकीची चौकशी सरकारने करावी अशी मागणी करत राहुल गांधींनी आज त्यांच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला.
पुढे ते म्हणाले, की अदानी घोटाळ्यावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपाने आपली सर्व ताकद लावली आहे.

भाजपाचे लोक सांगतात की आदानी वर आक्रमण म्हणजे देशावर आक्रमण देश अदानी आहे व अदानी देश आहे असे समीकरण झाले आहे.

जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की आदानी भ्रष्ट व्यक्ती आहे. तर या भ्रष्ट व्यक्तीला भारताचे पंतप्रधान वाचवण्याचा प्रयत्न का करत आहेत.

पुढे राहुल गांधी म्हणाले, माझी खासदारकी रद्द झाली तरी मी जनतेचे प्रश्न विचारत राहणार.
मला पुन्हा खासदारकीचे अपेक्षा नाही मला कायम बरखास्त केले तरी मी माझे काम करत राहणार मला काहीच फरक पडत नाही मी पार्लमेंटच्या आत आहे किंवा बाहेर आहे. मी माझे काम करत राहणार मी माझी तपस्या पूर्ण करणार आहे.

अदानी समुहातील गुंतवणूक ही देशाच्या संरक्षण खात्याशी संबंधीत असल्याने त्याची चौकशी व्हावी अशा मागणी ते वारंवार करत होते.

सर्वसामान्य जनतेला सत्य काय आहे हे सांगण्याचे काम मी कोणालाही न घाबरता करत राहणार.

See also  महाराष्ट्रात कधीही नव्हता तो राजकीय द्वेषाचा घाणेरडा पायंडा तुम्ही पाडताय -रोहित पवार