कर्वेनगर येथील भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम ई लर्निंग स्कूल मध्ये अतिरिक्त आयुक्त ओम प्रकाश दिवटे यांनी केले शालेय विद्यार्थ्यांचे स्वागत

कर्वेनगर :  पुणे मनपाच्या सर्व शाळा सुरू होत असून  कर्वेनगर प्रभागातील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल या ठिकाणीही पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने परिसर दुमदुमून गेला. ज्युनिअर केजी ते इयत्ता चौथी या वर्गांतील मुलांचे शाळेच्या पहिल्या दिवशी स्वागत करताना सर्व चिमुकल्यांनी सूर्यफूलाचे मुखवटे परिधान करून अनोख्या पद्धतीने शैक्षणिक वर्षांत प्रवेश केला. विद्यार्थी वर्गातील जागृती आणि सृजनशीलता वाढवण्यासाठी राबवण्यात आला.

याप्रसंगी मुलांचे स्वागत व मुलांना पाठ्यपुस्तके-शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यासाठी पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी उपस्थिती दर्शवत विद्यार्थी वर्गाला तसेच शिक्षक वृंदाला मार्गदर्शन केले आणि शाळेचा आजवरचा प्रवास तसेच वैविध्यपूर्ण उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी त्यांच्यासमवेत वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख सहाय्यक महापालिका आयुक्त दीपक राऊत उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास ज्यांच्या संकल्पनेतून हे सुंदर शैक्षणिक संकुल सत्यात उतरले त्या माजी नगरसेविका सौ. लक्ष्मीताई दुधाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष श्री. स्वप्नील दुधाने यांनीही उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत केला.

पुणे शिक्षण मंडळाचे सहाय्यक उपप्रशासकीय अधिकारी धनंजय परदेशी, वारजे कर्वेनगर परिसराच्या पर्यवेक्षिका अरुणा राईंज, सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्तात्रय चौधरी, कार्यक्रमाच्या नियोजनकर्त्या मुख्याध्यापिका सौ. लीना देशमुख, सूत्रसंचालिका सहशिक्षिका राजश्री भोसले, आभार मानताना शिक्षिका प्रीती थोरात तसेच सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.

See also  चंद्रकांतदादा पाटील यांच्या मॉर्निंग वॉक संवादात नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया