आंदगाव ता.मुळशी येथे शिवसेनेच्या वतीने महिलांना रोपांचे वाटप

मुळशी : शिवसेना (उबाठा) पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित आंदगाव (ता,मुळशी) येथील महिलांना आंब्याच्या झाडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

मुळशी तालुका शिवसेना पक्षाच्या वतीने दरवर्षी विविध उपक्रमाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला जातो याच अनुशंगाने यावर्षी देखील आगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आंदगाव येथील महिलांना आंब्याच्या झाडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

प्रत्येक महिलांनी एक तरी फळ झाड लावावे त्यामुळे पर्यावरण सुरक्षित राहील या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी मुबई निरीक्षक सत्यवान उभे,तालुका अध्यक्ष सचिन खैरे,सचिन दगडे, कैलास मारणे,नामदेव टेमघरे,शिवाजी उभे सरपंच प्रफुल मारणे,यांच्या हस्ते या रोपांचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी प्रगतिशील शेतकरी  रमेश मोगल यांनी झाड लावण्या नंतर त्याची काळजी कशी घ्यावी याबाबत उपस्थित महिलांना योग्य असे मार्गदर्शन केलं.

या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना उपजिल्हाधिकारी अमित कुडले,लहू तिकोने, विजय मारणे, अमित मारणे,सागर गुजर, आकाश भरेकर, वसंत उभे, सागर येणपुरे, कुंदन थरकुडे, मनोहर दगडे, विनोद दगडे यांच्या वतीने करण्यात आले होते.

See also  कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत बावधन येथे स्वच्छता अभियान निमित्त पथनाट्य व जनजागृती