बाणेर येथे गाडीची काच फोडून हृदयविकाराचा झटका आलेल्या नागरिकाचे सजग पोलीस कर्मचाऱ्याने वाचवले प्राण

बाणेर : बाणेर येथे पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सजगतेमुळे बाणेर येथील एका रहिवासाचे प्राण वाचले. गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका आल्याने वाहन चालक याची गाडी थांबवत गाडीची मागील काच फोडून बाणेर येथील नागरिकाला सुरक्षित हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो त्याचे प्राण वाचवले.

बाणेर येथील रहिवासी पोलीस कॉन्स्टेबल बक्कल क्रमांक 9980 सुशांत काशिनाथ रणवरे नेमणूक पोलीस मुख्यालय पुणे शहर येथे असून बाणेर गावी येते येत असताना अलोमा काऊंटी या सोसायटीच्या समोर सुरेश अडप्पा वय -५३ ही व्यक्ती जीप कंपनीची चार चाकी गाडी क्रमांक TS 08 HH 5544 स्वतः चालवत असताना अचानक रस्त्यांमध्ये हृदयविकाराचा झटका आला. गाडी हेलकावे खात असल्यामुळे पोलीस कर्मचारी सुशांत रणवरे यांनी त्यांची गाडी थांबवली. परंतु नागरिकाच्या तोंडामधून फेस येत असल्यामुळे त्यांना अटॅक आल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.  त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या गाडीची मागील दरवाजाची काच फोडून त्यांना खाली काढले असता त्यांच्या तोंडातून फेस येत होता. पोलीस प्रशिक्षणामध्ये शिकवल्याप्रमाणे त्यांना छातीवरती दाब देऊन आणि तोंडाने श्वास देऊन त्यांना तात्काळ जुपिटर हॉस्पिटल बाणेर येथे त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये स्वतः गाडी चालवून घेऊन आलो असता डॉक्टरांनी इमर्जन्सी वॉर्ड मध्ये बेड क्रमांक तीन येथे त्यांना ऍडमिट करून त्यांच्यावर तात्काळ उपचार केला. 

त्यानंतर त्यांच्या पत्नी यांना फोनवर संपर्क साधून बोलावून घेऊन त्यांना दिलासा देऊन आमच्या ताब्यातील त्यांच्या गाडीची चावी पाकीट आयफोन कंपनीचा मोबाईल हातामधील सोन्याच्या दोन अंगठ्या सुखरूप त्यांच्या ताब्यात दिले. वेळेवरती आम्ही त्यांना घेऊन आलो असता त्यांचे प्राण वाचले आहे अशी इमर्जन्सी वॉर्ड मधील डॉक्टरांनी सांगितले आहे पेशंटच्या घरच्यांनी पुणे शहर पोलिसांचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहे.

See also  समाजाच्या कल्याणासाठी राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेणे शक्य- विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे