भाजपा शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांच्या वतीने सुसगाव ते पाषाण नागरिकांसाठी मोफत वाहन प्रवास योजनेचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शुभारंभ

सुस : सुसगाव ते पाषाण नागरिकांसाठी मोफत वाहन प्रवास योजनेचा शुभारंभ केंद्रीय सहकार व नागरि हवाई वाहतूक राज्य मंत्री, खासदार मुरलीधर मोहोळ यांचा हस्ते करण्यात आला.भाजप पुणे शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे, मयुरी कोकाटे यांच्या माध्यमातून सुस गाव परिसरातील नागरिकांकरीता पाषाण व बाणेर परिसरात जाण्या-येण्यासाठी मोफत वाहन प्रवास व्यवस्था कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

सर्वसामान्य नागरिकांना दैनंदिन कामकाजाकरीता महादेव नगर, पारखे वस्ती,धनश्री पार्क,काळुबाई मंदिर, सुस गाव परिसरातील नागरिक बाणेर-पाषाण भागात येत असतात त्यांना पुरेशी वाहतूक व्यवस्था नव्हती ही बाब लक्षात घेऊन श्री राहुल कोकाटे यांनी भाजप च्या माध्यमातून ही मोफत सेवा सुरु केली.
सामान्य नागरिकांना आवश्यक सोईसुविधा पुरविण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी नेहमीच केला पाहिजे.राहुल कोकाटेंनी या परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रशासकीय यंत्रणेतुन सक्षम केली पाहीजे,व नव्यानेच पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या सुस भागातील रस्ते,विज,पाणी,ड्रेनेज यांन सारख्या नागरि समस्यांवर देखील पाठपुरावा करून सोडवणूक केली पाहिजे असे मंत्री महोदयांनी मत व्यक्त केले.

यावेळी मुळशी तालुका पंचायत समितीचे माजी अध्यक्ष श्री बाळासाहेब चांदेरे,पुणे शहर भाजप सरचिटणीस पुनीत जोशी, कोथरूड द.मंडल अध्यक्ष लहु बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, नगरसेवक सनी निम्हण, मा.सरपंच नारायण चांदेरे, मा.सरपंच अंजना चांदेरे, भाजप नेते प्रकाश बालवडकर, नितिन कोकाटे,शरद भोते,अनिकेत चांदेरे, सुहास  भोते,आबासाहेब सुतार, सचिन पाषाणकर, उत्तम जाधव, सुभाष भोळ, प्रविण आमले, रोहन कोकाटे, सचिन दळवी, दिशा ससार,गौरी चांदेरे,उमाताई गाडगीळ, कल्याणी टोकेकर, अस्मिता करंदीकर  यावेळी उपस्थित होते.

See also  कष्टकरी, कामगारांनी अनुभवली पुणे मेट्रोची सफर -वाडेकर दाम्पत्याचा पुढाकार