पाषाण : पाषाण-सुतारवाडी-बाणेर भागातील सर्विस रोड च्या कामांबाबत शहर भाजप उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांनी पुणे मनपा पथ विभागाचे मुख्य अभियंता श्री अनिरुद्ध पावसकर व प्रकल्प विभाग प्रमुख श्री दिनकर गोजारी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सुस-रोड येथील अभिनव कॉलेज लगत हायवे वरील पुलाचा डाव्या बाजुने सुतारवाडी कडे जाणार्या सर्विस रोड चे त्वरित काम सुरु करावे,तसेच सदर कामाच्या निविदेत हायवेवरील पुलावरून पादचाऱ्यांना खाली उतरण्यासाठी जीना करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
ऑडि शोरूम ते स्टेडियम दरम्यान हायवे लगतच्या सर्व इमारतींचे सर्विस रस्त्याचे फ्रंट मार्जिन पालिकेने ताब्यात घेऊन सर्विस रस्त्या त्वरित विकसित करावा,तसेच सर्विस रस्त्यात पावसाळी पाणी लाईन टाकण्यात यावी अशी मागणी राहुल कोकाटे यांनी केली.यावेळी श्री उत्तम जाधव व श्री सुभाष भोळ उपस्थित होते.