मराठमोळ्या सुविधा कडलग यांची माऊंटएव्हरेस्टला गवसणी

शिखर सर केल्यानंतर नववारी साडी नेसून हाती भगवा झेंडा घेत जल्लोष

पुणे : पुण्यातील महिला एव्हरेस्ट वीर सुविधा कडलग यांनी अथक परिश्रमाने अतिउच्च माऊंटएव्हरेस शिखर सर केले आहे.
तब्बल आठ हजार आठशे एकोणपन्नास उंचीचे शिखर सर करीत दोन मुलांची आई असणाऱ्या कडलग यांनी एक वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे.
या मोहिमेतून त्यांच्या शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला.
माउंटएव्हरेस्ट शिखराचे गिर्यारोहकांच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्त्व आहे.अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणारे हे शिखर चढण्यापूर्वी अनेक दिवस सराव करावा लागतो.

पुणे ते दिल्ली मार्गे काठमांडू काठमांडू ते रामशाप असा प्रवास करत ८ एप्रिल रोजी मोहिमस सुरुवात केली.
द अल्पायनिस्ट या गिर्यारोहण संस्थेचे गिर्यारोहक भगवान चवले यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत सुविधा कडलग,पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे सहभागी झाले.या गिर्यारोहकांना विविध अडचणीचा सामना करावा लागला प्रचंड वेगाने वाहणारे वारे अचानक बदलेल्या प्रतिकूल वातावरणामध्ये ही एवरेस्टवीर सुविधा कडलग यांनी मोहीम यशस्वी रीतीने पूर्ण केली.
“कडलग’ यांच्या माउंट एव्हरेस्ट या यशस्वी महत्त्वाकांक्षी मोहिमेने शरीर आणि मन यांना अपार टणक बनवलं,तरच हिमालयातील सर्वस्वी विपरीत वातावरणात टिकाव लागू शकतो.एव्हरेस्ट गाठता येऊ शकतं हेच कडलग यांनी दाखवून दिले आहे.सह्याद्रीच्या कडेकपारीत बागडणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधुनिक हिरकणी देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी एव्हरेस्टवर मराठी झेंडा फडकवला आहे.सुविधा कडलग यांचे या अतुलनीय कामगिरीसाठी समाजाच्या विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.गिर्यारोहण हा खेळ समाजात रुजवण्याचा ध्यास बाळगलेल्या सुविधा कडलग यांच्या असीम धैर्याची आणि परिश्रमांची ही गाथा नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत शिखर गाठण्याची मनात जिद्द ठेवली या प्रवासात कुटुंब हितचिंतक यांचे पाठबळ उर्जा देणारे होते.
कित्येक दिवसांपासून मनात जोपासलेल्या ध्येयाच्या दिशेने पडणारे प्रत्येक पाऊल निश्चितच मनाला आनंद देणारे होते.
उणें २० अंश सेल्सिअस तापमान प्रचंड थंडी राञीच्या प्रहरी चढाई अशा कठीण परिस्थितीत मध्ये ही सकारात्मक विचारांची साथ शिखर सर करण्यासाठी अधिक बळकट बनवत होती.
शिखर सर केल्यानंतर मोहिमेवरुन परतताना पाय घसरला माञ सुदैवाने वाचले.एवरेस्ट शिखराची यशस्वी मोहीम आयुष्यभर उर्जा देणारी आहे अशी भावना सुविधा कडलग यांनी व्यक्त केली.

See also  राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील - सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील